ऑस्ट्रेलियाला मोठा झटका; दुखापतीमुळे महत्वाचा गोलंदाज संघाबाहेर
क्रीडा

ऑस्ट्रेलियाला मोठा झटका; दुखापतीमुळे महत्वाचा गोलंदाज संघाबाहेर

सिडनी : दुसऱ्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. महत्वाचा गोलंदाज जेम्स पॅटिन्सनला दुखापत झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याला आराम देण्यात आला आहे. जेम्स पॅटिन्सन बरगड्यांना दुखापत झाली आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर जेम्स पॅटिन्सन कुटुंबासोबत सुट्ट्या साजऱ्या करत होता. त्यावेळी त्याच्या बरगड्यांना दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. ऑस्ट्रेलिया संघाने त्याचा बदली खेळाडू म्हणून कुणालाही संधी न देण्याची घोषणा केली आहे. असे असले तरी, चौथ्या कसोटी सामन्यापुर्वी त्याच्या दुखापतीची माहिती घेतली जाईल.

सात जानेवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान सिडनी येथे तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. भारतीय संघानं मेलबर्न येथे बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. आता तिसऱ्या सामन्यात कोण बाजी मारतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.