बीसीसीआयची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रचला विश्वविक्रम…
क्रीडा

बीसीसीआयची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रचला विश्वविक्रम…

मुंबई : बीसीसीआयसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. कारण आता थेट गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचे नाव नोंदवण्यात आले आहे. यामध्ये भारतामधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एक विश्वविक्रम रचला गेला आहे. त्यामुळे बीसीसीआयला आता हा जगातील सर्वात मानाचा पुरस्कार मिळाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बीसीसीआयने काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमचे उद्घाटन केले होते. त्यानंतर या स्टेडियममध्ये बरेच सामने खेळवले गेले. या सर्व सामन्यांपैकी एका लढतीत हा विश्वविक्रम रचला गेला होता. त्यामुळे या गोष्टीची दखल आता थेट गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे आणि आज बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

यावर्षी आयपीएलमधील महत्वाचे सामने या मैदानात खेळवण्यात आले होते. त्याचबरोबर काही आंतरराष्ट्रीय सामनेही या मैदानात झाले. पण आयपीएलच्या सामन्यात हा विश्वविक्रम झाला आहे. यावर्षी आयपीएलच्या फायनलमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना झाला. या अंतिम सामन्यात गुजरातच्या संघाने बाजी मारली. गुजरातचा संघ पहिल्यांदाच आयपीएलमध्ये उतरला होता आणि हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली त्यांनी जेतेपदाला गवसणी घातली होती. पण या अंतिम फेरीत एक विश्वविक्रम झाला होता. हा सामना स्टेडियममध्ये जाऊन तब्बल १ लाख, १ हजार आणि ५६६ लोकांनी पाहिला होता. आतापर्यंत टी-२० सामन्यासाठी एवढे जास्त चाहते कधीही मैदानात पोहोचले नव्हते. पण ही गोष्ट आयपीएलच्या अंतिम फेरीत पाहायला मिळाली. त्यामुळे थेट गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या गोष्टीची नोंद घेतली आहे आणि त्यांनी बीसीसीआयला यासाठी पुरस्कारही दिला आहे.

आता जगात सर्वाधिक क्षमतेचे स्टेडियम म्हणून गुजरातमधील हे स्टेडियम ओळखले जाते. आता तर या मैदानाच्या नावावर एक विश्वविक्रमही नोंदवला गेला आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही या गोष्टीची नोंद घेतली आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या शिरपेताच आता एक मानाचा तुला खोवला गेला आहे.