पाकिस्तानच्या बाबर आझमने मोडला विराटचा आणखी एक मोठा विक्रम
क्रीडा

पाकिस्तानच्या बाबर आझमने मोडला विराटचा आणखी एक मोठा विक्रम

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या सलामीवीर बाबर आझमने आज (ता. २५) भारताचा कर्णधार विराट कोहलीचा एक मोठा पराक्रम मोडीत काढला आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये सर्वात जलद दोन हजार धावा करण्याचा विक्रम यापूर्वी कोहलीच्या नावावर होता. पण हा विक्रम आता बाबर आझमच्या नावावर झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोहलीने आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ५६ सामन्यांमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या होत्या, पण आझमने यावेळी फक्त ५२ सामन्यांमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये आता सर्वात जलद दोन हजार धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर राहीलेला नाही. त्यामुळे कोहलीसाठी हा एक मोठा धक्का आहे.

आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये सर्वात जलद दोन हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच आहे. फिंचने ६२ सामन्यांमध्ये ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीमध्ये चौथ्या स्थानावर न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम आहे, त्याने ६६ सामन्यांमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीत पाचव्या स्थानावर न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल आहे.