अश्विनचे दमदार शतक; इंग्लंडसमोर भारताचे ४८२ धावांचे आव्हान
क्रीडा

अश्विनचे दमदार शतक; इंग्लंडसमोर भारताचे ४८२ धावांचे आव्हान

चेन्नई : अष्टपैलू रविचंद्रन अश्विन यानं संयमी फलंदाजी करत शतकी खेळी केली आहे. अश्विन याच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं सामन्यावर पकड मिळवली असून दुसऱ्या डावात सर्वबाद २८६ धावा केल्या आहेत. दुसऱ्या डावातील कर्णधार विराट कोहली आणि अश्विनच्या खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ४८२ धावांचे डोंगलाएवढे मोठे आव्हान ठेवले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अश्विनच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर भारतीय संघानं सामन्यावर पकड मिळवली आहे. अश्विन यानं सुरुवातीला कर्णधार विराट कोहलीच्या मदतीनं संघाचा डाव सावरला. कोहली बाद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढवली. तचेस आपलं वैयक्तीक शतकही पूर्ण केलं. अश्विन याचं हे पाचवं शतक आहे.

अश्विन आणि विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पहिल्या डावातील शतकवीर रोहित शर्मा २६ धावांवर बाद झाला. शुबमन गिल १४ तर चेतेश्वर पुजारा ७ धावांवर बाद झाले. पहिल्या डावांत अर्धशतकी खेळी करणारे ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावांत मात्र अपयशी ठरले. त्यांनी अनुक्रमे ८ आणि १० धावा काढल्या. त्यानंतर अक्षर पटेल ७, कुलदीप यादव ३ आणि इशांत शर्मा ७ धावांवर बाद झाले. मोहम्मद सिराज १६ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून फिरकीपटू मोईन अली आणि जॅक लीच यांनी प्रत्येकी ४-४ बळी मिळवले.

सामना संक्षिप्त स्वरूपात…
भारत पहिला डाव- सर्वबाद ३२९ (रोहित शर्मा-१६१; मोईन अली १२८/४)
इंग्लंड पहिला डाव- सर्वबाद १३४ (बेन फोक्स- ४२*; अश्विन ४३/५)
भारत दुसरा डाव- सर्वबाद २८६ (अश्विन १०६, विराट कोहली ६२; मोईन अली ९८/४, जॅक लीच १००/४)