५ लाखांहून अधिक भारतीयांचा फेसबुक डेटा चोरी; सीबीआयकडून गुन्हा दाखल
देश बातमी

५ लाखांहून अधिक भारतीयांचा फेसबुक डेटा चोरी; सीबीआयकडून गुन्हा दाखल

नवी दिल्ली : 5 लाखांहून अधिक भारतियाचा डेटा चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याबाबत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. ब्रिटनची कंपनी कँब्रिज अ‍ॅनालिटिकाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

5.62 लाख भारतीय फेसबुक युजर्सचा डेटा चोरी केल्याच्या आरोप या प्रकरणात करण्यात आला असून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात सीबीआयने युकेमधील अजून एक कंपनी ग्लोबल सायन्स रिसर्चविरोधातही कारवाई सुरू केली आहे.

भारतातील 5.62 लाख फेसबुक युजर्सची गोपनीय माहिती बेकायदेशीरपणे गोळा केल्याप्रकरणी सीबीआयने कँब्रिज अ‍ॅनालिटिकाविरोधात गुन्हा दाखल केलाय. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. फेसबुक-कँब्रिज अ‍ॅनालिटिका डेटा चोरी प्रकरणाची सीबीआय चौकशी करेल अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यापूर्वीच संसदेत दिली होती.

ग्लोबल सायन्स रिसर्चने बेकायदेशीरपणे 5.62 लाख भारतीय फेसबुक युजर्सचा डेटा गोळा केला आणि हा डेटा कॅब्रिज अ‍ॅनालिटिकासोबत शेअर केला, असं उत्तर सोशल मीडिया कंपनीने CBI ला दिलं होतं. कँब्रिज अ‍ॅनालिटिकाने ग्लोबल सायन्स रिसर्चकडून अवैधपणे खासगी डेटा घेतल्याचा आणि या डेटाचा वापर भारतातील निवडणुकीवर परिणाम होण्यासाठी केल्याचा आरोप आहे.