शिखर धवनसमोरील अडचणी एका फोटोमुळे वाढणार?
क्रीडा

शिखर धवनसमोरील अडचणी एका फोटोमुळे वाढणार?

नवी दिल्ली : भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन एका फोटोमुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्या फोटोमुळे त्याच्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते. वाराणसीत नावेतून फिरताना पक्षांना दाणे खाऊ घालतानाचा फोटो पोस्ट केल्यामुळे शिखर धवन अडचणीत सापडला आहे. शिखर धवन यानं शनिवारी आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशभरात विविध शहरात बर्ड फ्लूचं सावट आहे. बर्ड फ्लूचं संकट असताना पक्ष्यांना हाताळणं किंवा त्यांच्या संपर्कात येणं टाळावं असं प्रशासनाने बजावलं आहे. असं असताना शिखर धवनने पक्ष्यांना दाणे खाऊ घातल्यानं त्याच्यावर कारवाईची शक्यता आहे.

शिखर धवन यानं इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्यानंतर ते लगेच व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या फोटोनंतर स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची माहिती घेतली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, शिखर धवन याच्यावर कारवाईची शक्यता होऊ शकते. प्रशासन यावर गंभीर विचार करत आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन सध्या वाराणसीत मुक्कामी आहे. यावेळी त्यानं बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतले. तसंच गंगा आरतीही केली.