बीसीसीआयने बंदी घातलेल्या क्रिकेटपटूलाच निवड समीतीकडून संधी
क्रीडा

बीसीसीआयने बंदी घातलेल्या क्रिकेटपटूलाच निवड समीतीकडून संधी

मुंबई : क्रिकेट असोसिएशन उत्तराखंड पुन्हा एकदा वादात सापडलं आहे. क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयच्या आदेशांना धाब्यावर बसवत बंदी असलेल्या एका क्रिकेटपटूला विजय हजारे ट्रॉफीसाठी पाठवण्यात आलं आहे. पण आपल्याला याबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वय चोरल्याप्रकरणी बीसीसीआयने हल्दानीच्या एका क्रिकेटपटूवर 2018-2021 या कालावधीसाठी बंदी घातली होती. पण क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीने या क्रिकेटपटूला टीमसोबत चेन्नईला पाठवलं. मॅच न खेळताच हा क्रिकेटपटू परत आला.

उत्तराखंडचे माजी प्रशिक्षक वसीम जाफरच्या 22 सदस्यीय टीमलाही याबाबतची माहिती देण्यात आली होती. या प्रकरणाबाबत क्रिकेट असोसिएशन उत्तराखंडच्या कोषाध्यक्षांना विचारण्यात आलं, तेव्हा आपण हा मुद्दा उचलून धरू. एवढी मोठी चूक कशी झाली, याची चौकशी करू, असं सांगितलं आहे.

याआधी टीमचा माजी प्रशिक्षक वसीम जाफर याच्यावर मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप क्रिकेट असोसिएशनने केला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. वसीम जाफर याने खेळाडूंच्या निवडीमध्ये हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर वसीम जाफरवर हे आरोप करण्यात आले. जाफरने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.