भारतीय क्रिकेटपटूच्या आईचं कोरोनामुळे निधन
क्रीडा

भारतीय क्रिकेटपटूच्या आईचं कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : कोरोनाने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं असताना क्रीडाविश्वातूनही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताला अंडर -१९ विश्वचषक जिंकून देण्याऱ्या फिरकी गोलंदाज हरमीत सिंहच्या आईनं कोरोनामुळे जीव गमवला आहे. या बातमीनंतर क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२०१२ साली अंडर-१९ विश्वचषकात हरमीत सिंहने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. परमजीत कौर असं त्याच्या आईचं नाव असून त्या ५६ वर्षांच्या होत्या. रविवारी आईला इंजेक्शन हवं असल्याची एक पोस्ट त्याने इंस्टाग्रामवर टाकली होती.

हरमीत सिंह यापूर्वी राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळला आहे. हरमीत सिंह आतापर्यंत ३१ फर्स्ट क्लास, १९ लिस्ट ए आणि ७ टी-२० सामने खेळला आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने ८७ गडी बाद केलेत. त्याने ११ एप्रिल २०१३ साली राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता. त्यावेळी त्याने पुणे वॉरियर्सच्या रॉस टेलरला फिरकीच्या जादूत गुंतवून तंबूत पाठवलं होतं.