हॉकीपटू बलबीर सिंग यांचे निधन
क्रीडा

हॉकीपटू बलबीर सिंग यांचे निधन

चंडीगढ : १९५८च्या आशियाई क्रीडा स्पध्रेतील रौप्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य बलबीर सिंग यांचे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. माझे वडील बलबीर सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे रविवारी झोपेतच निधन झाले, अशी माहिती त्यांची मुलगी मनदीप सामरा यांनी दिली. त्यांचा मुलगा कॅनडात निवासास असून, कोरोनाच्या साथीमुळे तो अंत्यसंस्काराला येऊ शकला नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बलबीर यांचा जन्म २ मे १९३२ या दिवशी जालंधर येथील संसारपूर येथे झाला. या जिल्ह्य़ाने देशाला अनेक हॉकीपटू दिले आहे. बलबीर वयाच्या सहाव्या वर्षांपासून हॉकीकडे वळले. जालंधरमधील लायॉलपूर खालसा महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले.

१९५१मध्ये त्यांची भारतीय हॉकी संघात प्रथमच निवड झाली. १९६२मध्ये ते सेनादलात अधिकारीपदावर रुजू झाले. राष्ट्रीय स्पध्रेतही त्यांनी सेनादलाचे प्रतिनिधित्व केले. १९८४मध्ये निवृत्त झाले, तेव्हा त्यांचा हुद्दा मेजर असा होता. मग ते चंडीगढमध्येच स्थायिक झाले.