स्टेनगन थंडावली; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
क्रीडा

स्टेनगन थंडावली; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. स्टेनने आयपीएलपूर्वी आपल्या १७ वर्षाच्या कारकिर्दीचा शेवट केला. त्याने याआधी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दक्षिण आफ्रिकेच्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या स्टेनने २६५ सामन्यांमध्ये ६९९ आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या. त्याने ९३ कसोटी सामन्यांमध्ये ४३९, १२५ एकदिवसीय सामन्यात १९६ आणि ४७ टी-२० सामन्यांमध्ये ६४ विकेट्स घेतल्या आहेत.

स्टेनने २००४मध्ये इंग्लंडविरुद्ध पोर्ट एलिझाबेथमध्ये कसोटी पदार्पण केले. २००५मध्ये आफ्रिका इलेव्हनविरुद्ध सामना खेळून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर २००७मध्ये न्यूझीलंडविरुद्ध स्टेनने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. स्टेन बराच काळ संघाबाहेर होता. त्याने मार्च २०१९मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.