मोठी बातमी! कुस्तीपटू विनेश फोगाटवर बंदी
क्रीडा

मोठी बातमी! कुस्तीपटू विनेश फोगाटवर बंदी

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला ऑलिम्पिक स्पर्धा महागात पडली आहे. विनेशवर रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने तात्पुरती बंदी आणण्यात आली आहे. 53 किलोग्रॅम वजनी गटातील या भारताच्या स्टार कुस्तीपटूवर तीन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. दरम्यान फेडरेशनने तिला तिची बाजू मांडण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी दिला आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार विनेशला कोणतीही राष्ट्रीय किंवा देशांतर्गत स्पर्धा खेळता येणार नाही आहे, जोपर्यंत ती याबाबत तिची बाजू मांडत नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, विनेशवर मुख्यत्त्वे तीन आरोप करण्यात आले आहेत. एक म्हणजे तिने टोक्यो ऑलिम्पिक दरम्यान भारतीय टीमसह राहण्यास नकार दिला. दुसरा आरोप असा आहे की भारतीय टीमच्या कोचकडून प्रशिक्षण घेण्यास नकार दिला. तर तिसरा आरोप असा आहे की, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनकडून मंजुर करण्यात आलेले सिंगलेट (खेळाडूंकडून स्पर्धेदरम्यान परिधान करण्यात येणारे कपडे) तिने परिधान केले नव्हते. तिने त्याऐवजी तिचे प्रायोजक नायकीचे सिंगलेट परिधान केले. द इंडियन एक्स्प्रेसने WFIचे प्रेसिडेंट ब्रिज भुषण सिंह यांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान त्यांनी अशीही माहिती दिली की असा प्रकार पहिल्यांदा घडला नाही आहे. पण यापूर्वी खेळाडूची प्रतिष्ठा लक्षात घेता दूर्लक्ष करण्यात आले होते.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत विनेशला सुवर्णपदकाची दावेदार मानण्यात येत होतं, मात्र तिचा बेलारुसच्या व्हेनेसाकडून पराभव झाला. टोक्योमध्ये पोहोचण्यापूर्वी विनेश तिचे कोच वोलर अकोससह हंगेरीमध्ये होती. पंधरा दिवसांच्या ट्रेनिंगनंतर ती थेट टोकियोमध्ये पोहोचली, यावेळी तिने भारतीय टीमसह ट्रेनिंग घेण्यास किंवा राहण्यास नकार दिल्याची माहिती मिळते आहे.