सुवर्णपदक भारताचे माजी बॉक्सिंगपटू दिनको सिंह यांचे निधन
क्रीडा

सुवर्णपदक भारताचे माजी बॉक्सिंगपटू दिनको सिंह यांचे निधन

नवी दिल्ली : एशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेते बॉक्सर दिनको सिंह यांचे वयाच्या ४२व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. २०१७पासून त्यांच्यावर यकृताच्या कर्करोगावर उपचार सुरू होते. गेल्या वर्षी त्यांना कोरोनाची लागणही झाली होती. पण, त्यांनी या विषाणूवर मात केली होती. काही दिवसांपासून सिंग यांच्यावर आयएलबीएस, दिल्ली येथे उपचार सुरू होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तब्येत बिघडल्यामुळे त्यांना गेल्या वर्षी मणीपूरहून विमानाने दिल्ली येथे आणण्यात आले होते. मात्र, कावीळ झाल्यामुळे त्यांच्यावर कर्करोगावरील उपचार करता आले नाहीत. त्यानंतर पुन्हा त्यांना रुग्णवाहिकेतून २४०० किमी लांब असलेल्या मणिपूरला नेण्यात आले.

दिनको सिंह यांनी १९९८मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. १९९८मध्ये त्यांना अर्जुन आणि २०१३मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सहा वेळा विश्वविजेते एम. सी. मेरी कोम आणि एल सरिता देवी यांचे प्रेरणास्थान असलेल्या सिंग यांनी भारतीय नौदलात सेवा केली आणि प्रशिक्षक म्हणूनही काम केले, परंतु आजारपणामुळे त्याला घरीच राहावे लागले.