कृष्णप्पा गौतम ठरला एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला सर्वात महागडा खेळाडू
क्रीडा

कृष्णप्पा गौतम ठरला एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला सर्वात महागडा खेळाडू

चेन्नई : कर्नाटकचा युवा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतम एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कृष्णप्पा गौतम याला धोनीच्या चेन्नई संघानं लिलावात खरेदी केलं आहे. चेन्नई संघानं कृष्णाप्पा गौतम याला ९ कोटी २५ लाख रुपयांत खरेदी केलं आहे. त्याची बेस प्राईज फक्त २० लाख रुपये इतकी होती. यासह एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कृष्णप्पा गौतमसाठी हैद्राबाद आणि चेन्नई या फ्रँचाजींमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. पण अखेर चेन्नईनं बाजी मारली. २०१७ साली कृष्णप्पा गौतम याच्यावर पहिल्यांदा बोली लावण्यात आली. मुंबईने त्याच्यासाठी २ कोटी रुपये खर्च केले. २०१८ च्या हंगामापर्यंत त्याचं मानधन हे ६.२ कोटींवर पोहचलं होतं. त्यानंतर राजस्थानच्या संघाने याच किमतीत त्याला पंजाबच्या संघाकडे दिलं. गतवर्षी पंजाब संघानं त्याला करारमुक्त केलं होतं.

अष्टपैलू कृष्णप्पा गौतम यानं २०१८मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. आतापर्यंत २४ सामन्यात १३ विकेट घेतल्या आहेत. तर १८६ धावा चोपल्या आहेत. देशांतर्गत ६२ टी-२० सामन्यात ५९४ धावा चोपल्या आहेत तर ४१ बळी घेतले आहेत. टी-२० मधील ६० ही त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.