एकनाथ खडसेंना झटका; ईडीची मोठी कारवाई, मालमत्ता जप्त
राजकारण

एकनाथ खडसेंना झटका; ईडीची मोठी कारवाई, मालमत्ता जप्त

मुंबई : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना मोठा झटका बसला आहे. ईडीने भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात कारवाई करत त्यांची ५ कोटी ७३ लाख रुपयांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी ईडीकडून केली जात होती. एका प्रकरणात खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता खडसेंवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मनी लाँडरिंग प्रकरणात एकनाथ खडसेंची चौकशी केली जात असतानाच ही कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. ईडीच्या आरोपानुसार २०१६ मध्ये महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला. या भूखंडाचा बाजारभाव ३१ कोटी रुपये असताना गिरीश यांनी तो अवघ्या तीन कोटी रुपयांना विकत घेतला. हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा होता.

इतक्या कमी किंमतीत व्यवहार कसा काय झाला? गिरीश यांनी तो विकत घेण्यासाठी गोळा के लेल्या तीन कोटी रुपयांचा स्रोत काय? या मुद्यांवर ईडीने तपास सुरू केला होता.