कोहलीचा नवा विक्रम! कर्णधार म्हणून त्या यादीत पहिल्या क्रमांकावर
क्रीडा

कोहलीचा नवा विक्रम! कर्णधार म्हणून त्या यादीत पहिल्या क्रमांकावर

अहमदाबाद : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात शानदार फलंदाजी करत 52 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या. कोहलीच्या या खेळीमुळे भारताने इंग्लंडविरुद्ध निर्धारित 20 ओव्हरमध्ये 2 गडी गमावून 224 धावा केल्या. मात्र यात कोहलीने एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. कोहलीच्या पुढे टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंचच्या नावावर होता. त्याने कर्णधार म्हणून 1,462 धावा केल्या. पण आता कोहलीकडे 1,464 धावा आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन 1383 धावांनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन 1321 धावांनी चौथ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा फॉफ डुप्लीसी 1273 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

विराट कोहलीनं टी-20 सीरीजमध्ये 231 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेट सामन्यात भारतीय खेळाडूंचा विचार करायचा तर विराट कोहली पहिल्या आणि के एल राहुल दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 2020मध्ये न्यूझिलंड विरुद्ध सीरिजमध्ये 224 धावा केल्या होत्या. विराट कोहलीने आपल्या टी -20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 28 वे अर्धशतक ठोकलेच पण त्यासोबत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचा विक्रमही मोडला. कोहलीने कर्णधार म्हणून 12 व्या वेळी 50हून अधिक धावा केल्या आहेत. विल्यमसनने 11 वेळा हा करिष्मा केला आहे. कर्णधार म्हणून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार असताना 50 हून अधिक धावा करणाऱ्यांची नावं याप्रमाणे टीम इंडिया- कर्णधार विराट कोहली- 12 न्यूझीलंड- केन विलियमसन- 11 ऑस्ट्रेलिया- आरोन फिंच -10 इंग्लंड- इयोन मॉर्गन-09 असा क्रम लागतो.