मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी या भारतीय खेळाडूची निवड
क्रीडा

मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी या भारतीय खेळाडूची निवड

मुंबई : भारताचा माजी फिरकीपटू रमेश पोवार याची २० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय नाईक यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या सुमार कामगिरीनंतर माजी क्रिकेटपटू अमित पागनीस याने मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या मुंबईच्या प्रशिक्षकपदी आता पोवारची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारताकडून दोन कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळलेल्या ४२ वर्षीय रमेश पोवारने याआधी भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली आहे. त्याचबरोबर बेंगळूरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत काम करणाऱ्या पोवारकडे प्रशिक्षणाचा अनुभव असल्याने त्याच्याकडे मुंबईचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे.