उदयनराजे भोसलेंनी घेतली नाना पटोलेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान
राजकारण

उदयनराजे भोसलेंनी घेतली नाना पटोलेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर नाना पटोले यांनी आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांची दिल्लीत जाऊन सदिच्छा भेट घेतली. विशेष म्हणजे दिल्लीत असताना भाजपाचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले यांनी नाना पटोले यांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नाना पटोले आणि उदयन राजे भोसले यांच्या भेटीनंतर नाना पटोले यांनी ‘जस्ट वेट अॅण्ड वॉच..’ अशी सूचक प्रतिक्रिया दिल्यानं नवी चर्चा सुरू झाली आहे.या भेटीचा फोटोही समोर आला असून, त्यावरून राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानासमोरून जात असताना उदयनराजेंना पटोले बाहेर दिसले. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवून त्यांची भेट घेतली व प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे पटोले यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. “काँग्रेसला बळकटी देण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना सामावून घेण्याच्या दिशेनं काम सुरू आहे. ‘जस्ट वेट अॅण्ड वॉच..’ पुढे आश्चर्यकारक धक्के देऊ,” असं सूचक वक्तव्य पटोले यांनी भेटीनंतर केलं आहे.

दरम्यान, नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच निवड झाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी (ता. १२ फेब्रुवारी) रोजी दुपारी २.३० वाजता ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावर आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारला. ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नाना पटोले यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवला.  यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व जेष्ठ नेते, राज्य मंत्रिमंडळातील काँग्रेसचे मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दु. आ, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपत कुमार, सोनल पटेल, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.