IndvsAus : कोहलीचं अर्धशतक, मोडला धोनीचा विक्रम
क्रीडा

IndvsAus : कोहलीचं अर्धशतक, मोडला धोनीचा विक्रम

अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावले आहे. या अर्धशतकाबरोबरच कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर विराटने अजिंक्य रहाणेच्या साथीने संघाचा डाव सावरत अर्धशतक झळकवालं. कसोटी क्रिकेटमधलं विराटचं हे २३ वं अर्धशतक ठरलं. या अर्धशतकी खेळीदरम्यान विराटने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. त्याने धोनीचा ८१३ धावांचा विक्रम मोडला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नाणेफेक जिंकत विराटने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर पृथ्वी शॉच्या अपयशाची मालिका सुरुच असून स्टार्कच्या गोलंदाजीवर तो शून्यावर माघारी परतला. यानंतर पॅट कमिन्सने मयांकचा त्रिफळा उडवत भारताला आणखी एक धक्का दिला. यानंतर विराटने महत्वपूर्ण भागीदाऱ्या करत भारताच्या डावाला आकार दिला. दौऱ्यात आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या विराटला 74 धावांवर माघारी परतावं लागलं. जॉश हेजलवूडने त्याला धावबाद केले.

भारतीय कर्णधारांध्ये अॅलन बॉर्डर- गावास्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहली पाठोपाठ महेंद्रसिंह धोनीने धावा केल्या असून कर्णधारांच्या यादीत सौरव गांगुली तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने ४४९ धावा केल्या आहेत.