पुण्यात जन्मलेल्या मुलीला आई-वडिलांनी अनाथ आश्रमात सोडले; नशिब असं बदलंल की झाली ऑस्ट्रेलियाची कॅप्टन
क्रीडा

पुण्यात जन्मलेल्या मुलीला आई-वडिलांनी अनाथ आश्रमात सोडले; नशिब असं बदलंल की झाली ऑस्ट्रेलियाची कॅप्टन

सिडनी: भारतातील अनेक लोकांनी परदेशात जाऊन नाव कमावले आहे. अशा लोकांची यादी बरीच मोठी असली तरी या यादीत असे एक नाव आहे जे सर्वात वेगळं आहे. हे नाव मुळेचे महाराष्ट्रातील आणि तेही पुण्यातील आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुण्यातील एका दाप्यत्याला मुलगी जन्माला आली. जन्मानंतर आई-वडिलांना तिचा संभाळ करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी शहरातील श्रीवास्तव अनाथ आश्रमात तिला सोडले. आई-वडिलांच्या प्रेमाशिवाय मोठी होणाऱ्या त्या मुलीच्या नशिबात कसे आयुष्य येईल हे कोणालाच माहिती नव्हेत. पण नियतीने तिच्यासाठी एक मोठी गोष्ट निश्चित केली होती.

पुणे शहरात एका अनाथ आश्रमात वाढलेल्या या मुलीचे नशिब अचानक बदलले आणि ती थेट ऑस्ट्रेलियाला गेली. आश्रमातील या मुलीचे नाव लैला असे ठेवण्यात आले होते. त्याच दरम्यान अमेरिकेतील हरेन आणि सू स्थळेकर हे दाम्पत्य भारतात आले होते. त्यांना एक मुलगी होती आणि आणखी एका मुलीला दत्तक घेण्यासाठी ते भारतात आले होते.

एका गोंडस आणि सुंदर मुलीचा त्यांचा शोध पुण्यातील श्रीवास्तव अनाथ आश्रमात संपला. सू यांची नजर लैलावर गेली त्यांनी तिला दत्तक घेण्याचे ठरवले. या दाम्पत्याने लैलाला दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि लैलाच्या जन्माच्या ३ आठवड्यात ते अमेरिकेला गेले. काही वर्षांनी त्यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात स्थायिक होण्याचे ठरवले.

लैलाची आता लिसा स्थळेकर झाली होती. दत्तक घेणारे वडील हरेन यांनी लिसाला क्रिकेट खेळण्यास शिवकले. घरातील मोकळ्या जागेत क्रिकेट खेळणारी लिसा थोडी मोठी झाल्यावर गल्लीतील मुलांसोबत खेळू लागली. लिसाला क्रिकेटचे वेड लागले पण याच बरोबर ती अभ्यासात देखील मागे नव्हती. क्रिकेट प्रशिक्षण सुरू असताना तिने देशातील स्थानिक क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला. आता मात्र तिची बॅट जास्त बोलू लागली. काही वर्षातच तिला ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळाले.

लिसा फक्त ऑस्ट्रेलिया संघातील एक सदस्य म्हणून राहिली नाही. तर दमदार कामगिरीच्या जोरावर तिने संघाचे कर्णधारपद देखील मिळवले. लिसाने ऑस्ट्रेलियाकडून ८ कसोटी, १२५ वनडे आणि ५४ टी-२० सामने खेळले. कसोटीत ४१६ धावा, वनडेत २ हजार ७२८ आणि टी-२०मध्ये ७६९ धावा तिच्या नावावर आहेत. गोलंदाजीत तिने अनुक्रमे २३,१४६ आणि ६० विकेट घेतल्या आहेत.

वनडे क्रिकेटमध्ये १ हजार धावा आणि १०० विकेट घेणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे. लिसाने ऑस्ट्रेलियाकडून ३ वर्ल्डकप खेळले. २०१३ साली वर्ल्डकप जिंकल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आयसीसीकडून लिसाचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. लिसाने ३ मार्च २०१२ रोजी श्रीवास्तव अनाथ आश्रमाला भेट दिली होती.