ICC T20I Ranking : टॉप टेनमध्ये केवळ २ भारतीय फलंदाज तर एकाही गोलंदाजाचा नाही समावेश
क्रीडा

ICC T20I Ranking : टॉप टेनमध्ये केवळ २ भारतीय फलंदाज तर एकाही गोलंदाजाचा नाही समावेश

नवी दिल्ली : आयसीसीने टी-२० क्रिकेटमधील नुकतीच टॉप १० खेळाडूंची यादी जाहीर केली असून या यादीत केवळ २ भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. तर एकाही गोलंदाजाला या यादीत स्थान मिळवता आलेले नाही. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात टी-२० मालिकेत पराभूत करण्यात यशस्वी झालेल्या भारतीय फलंदाजांना टी-२० क्रमवारीत फायदा झालेला आहे. भारतीय संघाचा उप-कर्णधार लोकेश राहुलच्या स्थानात एका अंकाची सुधारणा झाली असून तो तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचला मागे टाकलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कर्णधार विराट कोहलीच्या क्रमवारीतही सुधारणा झाली असून तो नवव्या स्थानावरुन आठव्या स्थानावर आला आहे. अंतिम सामन्यात विराटने केलेल्या ८५ धावांच्या खेळीचा त्याला चांगला फायदा झाला आहे. तर सांघिक क्रमवारीत टीम इंडियाने आपलं तिसरं स्थान कायम राखलं आहे. अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला विजय आवश्यक होता. परंतू ऑस्ट्रेलियाने या सामन्यात बाजी मारल्यामुळे भारताला तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं आहे.

त्याचबरोबर गोलंदाजाच्या यादीत कोणताही भारतीय गोलंदाज स्थान मिळवू शकला नाही. या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर अफगाणिस्तानचे अनुक्रमे राशिद खान आणि मुजीब हे विराजमान आहेत. तर फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा डेव्हिड मालन आणि पाकिस्तानचा बाबर आझम अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.