पराभवानंतर इंग्लंडच्या नावावर खराब विक्रमाची नोंद
क्रीडा

पराभवानंतर इंग्लंडच्या नावावर खराब विक्रमाची नोंद

अहमदाबाद : इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताने दहा गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसऱ्याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. या पराभवासोबतच इंग्लंडच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर संपुष्टात आला. तर दुसऱ्या डावात इंग्लंडला केवळ ८१ धावाच करता आल्या. दोन्ही डावात मिळून इंग्लंडने १९३ धावा केल्या. इंग्लंडच्या संघाचे दोन्ही डाव ज्या दिवशी सुरू झाले त्याच दिवशी संपले. अशा सुमार फलंदाजीमुळे इंग्लंडच्या संघाच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. कोणत्याही कसोटी सामन्यात ज्या दिवशी डाव सुरू झाला त्याच दिवशी संघ बाद होणे आणि दोन्ही डावात मिळून २०० धावांचा टप्पाही न ओलांडणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे.

दरम्यान, पहिल्या डावात इंग्लंडने ११२ तर भारताने १४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव ८१ धावांत आटोपला आणि भारताला ४९ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (२५*) आणि शुबमन गिल (१५) यांनी सहज पूर्ण केले.