पाकिस्तान क्रिकेट संकटात; कर्णधाराच्या विरोधात निवड समिती
क्रीडा

पाकिस्तान क्रिकेट संकटात; कर्णधाराच्या विरोधात निवड समिती

नवी दिल्ली : टी-२० विश्वकरंडकापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संकटात सापडले आहे. कर्णधार बाबर आझमच्या यांचं ऐकण्यास निवड समितीनं नकार दिला असून कर्णधाराच्या विरोधात निवड समिती उभारल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान संघाचा वरिष्ठ खेळाडू शोएब मलिकचा संघामध्ये समावेश करावा अशी बाबरची मागणी आहे. मात्र त्याच्या या मागणीकडं निवड समितीचे प्रमुख मोहम्मद वासिमनं दुर्लक्ष केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

१७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या दरम्यान यूएई आणि ओमानमध्ये हा टी२० वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि भारत या दोन्ही टीम एकाच ग्रुपमध्ये असून २४ ऑक्टोबर रोजी त्यांचा सामना होणार आहे. ‘क्रिकेट पाकिस्तान’नं दिलेल्या बातमीनुसार बाबर आझमनं शोएब मलिकला एक संधी देण्याची मागणी केली आहे. पण निवड समितीनं त्याला सकारात्मक उत्तर दिलेलं नाही.

शोएब आता ३९ वर्षांचा आहे. त्यामुळे तो टीममध्ये निवड होण्यासाठी योग्य नाही, असं निवड समितीचं मत आहे. गेल्या १४ सामन्यात पाकिस्तानकडून बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि फखर जमां या तीनच फलंदाजांनी अर्धशतक झळकावले आहे. त्यांच्या मिडल ऑर्डरनं सातत्यानं निराशा केली आहे. त्यामुळेच टी 20 क्रिकेटमध्ये 10 हजार पेक्षा जास्त रन करणाऱ्या शोएब मलिकच्या समावेशासाठी बाबर आग्रही आहे.