पाकिस्तानी क्रिकेटपटू इंझमामला हृदयविकाराचा झटका; सचिनचे ट्वीट
क्रीडा

पाकिस्तानी क्रिकेटपटू इंझमामला हृदयविकाराचा झटका; सचिनचे ट्वीट

मुंबई : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरने इंझमामसाठी एक ट्वीट केले आहे. सध्या यूएईमध्ये मुंबई इंडियन्सला मार्गदर्शन देणाऱ्या सचिन तेंडुलकरने ट्वीट करून त्याचा मित्र आणि जुना प्रतिस्पर्धी इंझमाम-उल-हकसाठी संदेश पाठवला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सचिनने लिहिले आहे की, ‘इंझमाम तू लवकर बरा हो, मला हेच हवे आहे. तू नेहमीच शांत पण मजबूत आणि मैदानावर एक फायटर राहिला आहेस. मी आशा आणि प्रार्थना करतो, की तू या परिस्थितीतून बाहेर पडशील. लवकर बरा हो. सचिन व्यतिरिक्त इतर अनेक दिग्गज व्यक्तींनी इंझमाम-उल-हकच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.

दरम्यान. काल इंझमामला झटका आल्यानंतर त्याला तातडीने लाहोरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इंझमाम-उल-हकची अँजिओप्लास्टी यशस्वी झाली आहे. त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितले, की सध्या इंझमामची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर क्रिकेटविश्वातून अनेक खेळाडूंनी इंझमामसाठी प्रार्थना केली आहे.