पदार्पणाच्या सामन्यात क्रुणाल पांड्याचे विक्रमी अर्धशतक
क्रीडा

पदार्पणाच्या सामन्यात क्रुणाल पांड्याचे विक्रमी अर्धशतक

पुणे : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू क्रुणाल पंड्याने आपल्या पदार्पणात विक्रमी अर्धशतक झळकावले. पदार्पणाच्या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा मान आता क्रुणालच्या नावावर जमा झाला आहे. हे विक्रमी अर्धशतक झळकावल्यावर कृणालला मैदानात रडू आवरेनासे झाले होते, त्याचबरोबर त्याचा भाऊ हार्दिकही यावेळी भावुक झालेला पाहायला मिळाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

https://twitter.com/pandey_sauhard/status/1374334372426309633

भारताची अवस्था ४१व्या षटकात ५ बाद २०५ अशी अवस्था होती. त्यावेळी भारतीय क्रुणाल फलंदाजीला आला आणि त्याने इंग्लंडच्या गोलंदाजीवर चौफेर हल्ला चढवला. इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना कृणालने २६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. आतापर्यंत पदार्पण करताना कोणत्याही खेळाडूला एवढ्या कमी चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करता आलेले नाही. वडिलांच्या निधनानंतर तो पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता. त्याचबरोबर आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात त्याने नाबाद अर्धशतकही झळकावले होते. त्यामुळे क्रुणालने जेव्हा आपले अर्धशतक पूर्ण केले तेव्हा आकाशाकडे पाहत तो रडायला लागला. त्यावेळी कृणालचा भाऊ हार्दिकही भावुक झाल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यात कृणालने ३१ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ५८ धावांची खेळी साकारली.

कृणाल आणि लोकेश राहुल या दोघांनीही यावेळी आपले अर्धशतक झळकावलेच, पण त्याचबरोबर भारतीय संघाला तिनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. या दोघांच्या फटकेबाजीमुळे भारतीय संघाला ३१७ धावा करता आल्या. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी यावेळी ११२ धावांची अभेद्य भागीदारी रचली.