Tokyo Paralympics 2020 स्पर्धेला सुरुवात
क्रीडा

Tokyo Paralympics 2020 स्पर्धेला सुरुवात

टोकियो : टोकियो पॅरालिंपिक्स स्पर्धेला आज (ता. २४)पासून सुरु झाली आहे. उद्घाटन सोहळ्यात ७५ जणांनी कला सादर केली. दुसरीकडे मैदानही रिकामी होतं. गगनभेदी आतषबाजी केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वात आधी जापानचा झेंडा मैदानात आणला गेला आणि राष्ट्गीत गायलं गेलं. त्यानंतर एक एक करत इतर देशाचा चमू मैदानात उतरला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारताकडून शॉटपुटचा पॅरा अॅथलीट टेक चंदने भारतीय पथकाचे तिंरगा घेऊन नेतृत्व केले. त्याच्यासोबत भारताचे ८ सदस्य होते. यापूर्वी ध्वजवाहकाची जबाबदारी मरियप्पन थंगावेलु यांच्याकडे होती. मात्र शेवटच्या क्षणी ही धुरा टेक चंदकडे देण्यात आली. दुसरीकडे, न्यूझीलंडच्या पॅरालिम्पिक चमूने उद्घाटन सोहळ्यात सहभाग नोंदवला नाही. टोकियोत वाढत्या कोरोना रुग्णामुळे न्यूझीलंडने हा निर्णय घेतला.

पॅरालिम्पिक खेळाची सुरुवात १९६० मध्ये करण्यात आली. भारताने तेल अवीव पॅरालिम्पिक १९६८ मध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता. त्यानंतर १९८४ पासून भारत या स्पर्धेत सलग भाग घेत आहे. आतापर्यंत भारताने ११ पॅरालिम्पिक खेळात भाग घेतला आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ४ कांस्य पदक पटकावले आहेत. यातील १० पदकं भारताने अ‍ॅथलेटिक्स प्रकारात मिळवली आहेत.