भारतीय संघाला मोठा झटका; या खेळाडूला कोरोना झाल्याने दुसरा टी-२० सामना स्थगित
क्रीडा

भारतीय संघाला मोठा झटका; या खेळाडूला कोरोना झाल्याने दुसरा टी-२० सामना स्थगित

कोलंबो : भारत आणि श्रीलंक यांच्यादरम्यान होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यांपूर्वी भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे दोन्ही संघांना आयसोलेट केले असून आजचा सामना स्थगित करण्यात आला आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या, तर हा सामना उद्या बुधवारी म्हणजेच २८ जुलैला खेळला जाणार असल्याचे वृत्त वृत्तसंस्थेकडून देण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कृणालला कोरोनाची लागण झाल्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्यात येणाऱ्या पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियातील तीन खेळाडू शुबमन गिल, आवेश खान, वॉशिंग्टन सुंदर हे दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर चांगल्या लयीत असलेल्या पृथ्वी आणि सूर्यकुमारला इंग्लंडमधून बोलावणे आले होते. पण आता त्यांच्या जाण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

भारताने वनडे मालिका २-१ने जिंकली होती आणि टी-२० मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेच्या संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आणि व्हिडिओ विश्लेषक वनडे मालिका सुरू होण्यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे ही मालिकाही पुढे ढकलण्यात आली होती.