रोनाल्डोचे मँचेस्टर युनायटेडमध्ये पुनरागमन
क्रीडा

रोनाल्डोचे मँचेस्टर युनायटेडमध्ये पुनरागमन

नवी दिल्ली : ख्रिस्तियानो रानोल्डोचे मँचेस्टर युनायटेडमधील पुनरागमन शुक्रवारी निश्चित झाले आहे. रोनाल्डोने युव्हेंटस क्लबमधून स्थलांतरण प्रक्रिया पूर्ण केल्याच्या वृत्ताला संबंधित क्लबकडून दुजोरा देण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२०१८मध्ये रोनाल्डोने रेयाल माद्रिदमधून युव्हेंटस क्लबमध्ये स्थलांतराचा करार केला होता. माद्रिदचे नऊ वर्षे प्रतिनिधित्व करताना रोनाल्डोने ४३८ सामन्यांत ४५० गोल केले होते. याशिवाय चॅम्पियन्स लीग जेतेपदासह चार महत्त्वाची जेतेपदे पटकावली होती. रोनाल्डो युव्हेंटस क्लब सोडण्याच्या तयारीत असल्याचे युव्हेंटसचे प्रशिक्षक मॅसिमिलिआनो अलेग्री यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. रोनाल्डोचा समन्वयक जॉर्ज मेंडीसनेही या वृत्ताला दुजोरा दिला होता.

पोर्तुगालचा आक्रमक रोनाल्डाने २००३ ते २००९ या कालावधीत मँचेस्टरला आठ महत्त्वाची जेतेपदे जिंकून दिली होती. याबाबत कराराचा आकडा स्पष्ट होऊ शकलेल नसला, तरी ब्रिटन आणि इटलीच्या प्रसारमाध्यमांनी रोनाल्डोने दोन वर्षांसाठी दोन कोटी, ५० लाख युरोचा करार केल्याचे म्हटले आहे.