भारताला मोठा झटका; हा खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, इंग्लंडविरुद्धही साशंकता
क्रीडा

भारताला मोठा झटका; हा खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, इंग्लंडविरुद्धही साशंकता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे. पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झालेला मोहम्मद शमी पुढील ६ आठवड्यांपेक्षा जास्त काळ क्रिकेट खेळू शकणार नाहीये. त्यामुळे आगामी वर्षात घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यालाही शमी मुकण्याची शक्यता आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मोहम्मद शमीचं प्लास्टर निघालं की तो सर्वात आधी एनसीएमध्ये जाऊन आपला फिटनेस सुधारण्याकडे लक्ष देईल. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत तो खेळू शकणार नाही. त्याला दुखापतीमधून सावरायला किमान ६ आठवडे लागतील. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याच्या खेळण्याची साशंकता आहे.

अ‍ॅडलेड कसोटीत दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना शमीच्या हाताला बॉल लागला होता. ज्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली होती. ज्यामुळे भारतीय संघाचा दुसरा डाव ९ बाद ३६ वर संपला होता. २०२१ साली इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे.