ऑस्ट्रेलियाला विरुद्धच्या सामन्यातील पराभवावर विराट कोहली म्हणाला; आमचा एकतर्फी …
क्रीडा

ऑस्ट्रेलियाला विरुद्धच्या सामन्यातील पराभवावर विराट कोहली म्हणाला; आमचा एकतर्फी …

सिडनी : ऑस्ट्रेलियाला विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 51 धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 390 धावांचं आव्हान ठेवलं. भारतीय संघाने 51 धावांनी सामना गमावला आणि यजमान संघाने वनडे सीरिजमध्ये 2-0 ने जिंकली. मात्र रविवारी झालेल्या या सामन्याच्या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली प्रचंड नाराज झाला आहे. मात्र त्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाचं कौतुकही केलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विराटने संघाच्या गोलंदाजीबाबत निराशा व्यक्त करत म्हंटले की, ”आमच्या संघाची गोलंदाजी जास्त प्रभावी नव्हती. त्यामुळे आमचा आमचा एकतर्फी पराभव झाला. तसेच त्यांच्या संघातील फलंदाजांची फळी मजबूत असून त्यांना अचूक माहिती आहे की, सामना कसा आपल्याकडे खेचून आणायचा. तुम्ही पाहिलं तर आम्ही 340 (338) धावांपर्यंत पोहोचलो तरिदेखील 51 धावांनी सामना गमवावा लागला.’

‘जर आम्ही दोघं 40-41 ओव्हरपर्यंत खेळलो आणि शेवटच्या 10 ओव्हर्समध्ये 100 धावा जरी करायच्या असल्या तरी हार्दिक पंड्याच्या मदतीने आपण आव्हान गाठू शकतो. अशी आमची रणनीति होती. परंतु, त्यांनी माझा आणि श्रेयस अय्यरला बाद करत सामना स्वतःच्या बाजूने फिरवला.’ असं विराट कोहली म्हणाला.

कोहली म्हणाला की, ऑस्ट्रेलियाच्या फिल्डर्सनी त्याचा आणि श्रेयस अय्यरला कॅच पकडत बाद केलं, तो त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट होता. तसेच, ‘स्कोअरबोर्ड पाहा, आम्ही 340 धावा केल्या आणि 51 धावांनी आमचा पराभव झाला. त्यांनी दिलेल्या आव्हान गाठण सोपं नसणार आम्हाला नेहमीच माहीत होतं. पण एक किंवा दोन विकेट्समुळे आम्हाला 13, 16 धावा प्रति ओव्हरच्या वेगाने करणं गरजेच होतं. त्यामुळे आम्हाला सलग शॉट खेळायचे होते.’

तसेच, ‘मला वाटतं की, त्यानेच या पीचवर गोलंदाजी करण्याचा प्लान सांगितला. त्याने चांगली गोलंदाजी केली. त्याने गोलंदाजी करणं प्लानमध्ये कुठेच नव्हतं. परंतु, मी त्याला केवळ विचारलं.’ पांड्याने उत्तम गोलंदाजी केली. चार ओव्हर्समध्ये त्याने केवळ 24 धावा देत एक विकेटही घेतला. हा एक विकेट 104 धावा करणाऱ्या स्टीव्ह स्मिथचा होता. असेही कोहलीने सांगितले. दरम्यान, या सामन्यामध्ये हार्दिक पांड्याला गोलंदाजी करावी लागली. पांड्याने पहिल्या सामन्यानंतर सांगितलं होतं की, तो सध्या गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे फिट नाही. परंतु, दुसऱ्या वनडे सामन्यात कोहलीने त्याच्याकडे चेंडू दिला.