एकदिवसीय क्रमवारीत विराटची पिछेहाट; आता हा फलंदाज पहिल्या स्थानावर
क्रीडा

एकदिवसीय क्रमवारीत विराटची पिछेहाट; आता हा फलंदाज पहिल्या स्थानावर

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीची तब्बल साडेतीन वर्षांनंतर प्रथमच आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पिछेहाट झाली आहे. विराटला क्रमवारीतील आपले अग्रस्थान गमवावे लागले आहे. या स्थानावर आता पाकिस्तानच्या बाबर आझमने बाजी मारली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानच्या बाबर आझमने कारकीर्दीत प्रथमच अग्रस्थानी झेप घेताना कोहलीचे साम्राज्य खालसा केले आहे. आझमने आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या लढतीत ९४ धावांची खेळी साकारल्याने १३ गुणांची कमाई केली आणि कोहलीला मागे टाकले. आता त्याच्या नावावर ८६५ गुण असून दुसऱ्या स्थानावरील कोहलीच्या खात्यात ८५७ गुण जमा आहेत.

ऑक्टोबर २०१७मध्ये अग्रस्थान पटकावणाऱ्या कोहलीची १,२५८ दिवसांनंतर क्रमवारीत घसरण झाली आहे. दरम्यान, एकदिवसीय क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेण्याचा आनंद बाबर आझमने दणक्यात साजरा केला.