मुंबईचा पंजबाविरुद्धच्या सामन्यात लाजिरवाणा विक्रम
क्रीडा

मुंबईचा पंजबाविरुद्धच्या सामन्यात लाजिरवाणा विक्रम

मुंबई : चेन्नईत सुरु असलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबने मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, मुंबईसाठी हा निर्णय चांगला ठरला नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईने पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा लाजिरवाणा विक्रम नोंदवला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये मुंबईने फक्त २१ धावा केल्या. या दरम्यान मुंबईने सलामीवीर फलंदाज क्विंटन डि कॉकला गमावले. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात डि कॉकने दीपक हुडाला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण, हेन्रिक्सने त्याचा झेल टिपला. डि कॉकला 3 धावा करता आल्या. पॉवरप्लेनंतर किशनही १७ चेंडूत केवळ ६ धावा करून बाद झाला.

आतापर्यंत आयपीएलमध्ये मुंबईच्या पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावा
१७/३ वि. पंजाब मुंबई २०१५
२१/२ वि. पंजाब विशाखापट्टणम २०१६
२१/४ वि. बंगळुरू बंगळुरू २०१७
२१/१ वि. पंजाब चेन्नई २०२१*