१२ वर्षानंतर विराट कोहलीच्या नावावर खराब रेकॉर्डचा दुर्दैवी योगायोग
क्रीडा

१२ वर्षानंतर विराट कोहलीच्या नावावर खराब रेकॉर्डचा दुर्दैवी योगायोग

सिडनी : २०२० वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघ विराटच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडमध्ये ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळला होता. यानंतर थेट नोव्हेंबर महिन्यात भारताने विराटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळली. वन-डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या खराब कामगिरीचं सत्र कायम राहिलं आहे. परंतू विराट कोहलीच्या बाबतीत यंदा पहिल्यांदाच एक दुर्दैवी योगायोग जुळून आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२००८ साली आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या विराटला त्या वर्षात एकही शतक झळकावता आलं नव्हतं. यानंतर तब्बल १२ वर्षांनी विराटवर ही नामुष्की ओढावली आहे. 2020 मध्ये विराटला एकही शतक करता आलेले नाही आणि आजच्या सामन्यानंतर भारताचा एकही एकदिवसीय सामना होणार नाही.

पहिले दोन सामना गमावल्यानंतर तिसऱ्या वन-डे सामन्यातही भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी सुरुच राहिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाच्या फलंदाजांनी एकामागोमाग एक माघारी परतण्याचा सिलसिला कायम ठेवला. विराटने एकाकी झुंज देत ६३ धावांची खेळी केली. पण जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक कॅरीकडे झेल देत तो माघारी परतला.