५६ वर्षापासून विक्रम अबाधित असणाऱ्या अष्टपैलू खेळाडूचे निधन
क्रीडा

५६ वर्षापासून विक्रम अबाधित असणाऱ्या अष्टपैलू खेळाडूचे निधन

मुंबई : 56 वर्षांपासून एक रेकॉर्ड कायम आहे. त्या विक्रमाची बरोबरी करणं देखील अजून कुणाला जमलेलं नाही. पहिल्याच टेस्टमध्ये शतक आणि पाच विकेट्स घेण्याचा विक्रम करणाऱ्या एकमेव ऑल राऊंडर न्यूझीलंडचे ऑल राऊंडर ब्रुस टेलर यांचं शनिवारी सकाळी निधन झालं आहे. ते 77 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून टेलर आजारी होते. यामध्येच त्यांचं निधन झालं. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानंही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टेलर यांनी 1965 ते 1973 या काळात न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं. या आठ वर्षांमध्ये त्यांनी 30 टेस्ट आणि 2 वन-डे मॅच खेळल्या. या आठ वर्षांच्या टेस्टकारकीर्दीमध्ये त्यांनी 20.04 च्या सरासरीनं 998 रन केले. यामध्ये दोन शतक आणि दोन अर्धशतकांचाही समावेश आहे. त्याचबरोबर त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 111 विकेट्सही घेतल्या. एका डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची किमया त्यांनी पाच वेळा केली.

टेलर यांचं टेस्ट क्रिकेटमधील पदार्पण हे मोठं सनसनाटी ठरलं. कोलकातामध्ये 1965साली भारताविरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये त्यांनी पदार्पण केलं. त्या मॅचमध्ये त्यांनी आठव्या क्रमांकावर येत फक्त 158 मिनिटांमध्ये 14 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 105 रन काढले होते. त्यानंतर त्यांनी एकाच डावात पाच विकेट्सही घेतल्या. पदार्पणातील टेस्टमध्ये शतक आणि नंतर एका डावात पाच विकेट हा त्यांचा विक्रम आजही अबाधित आहे.