कराडजवळ आणखी एक अपघात; स्विफ्ट डिव्हायडरला धडकली, 4 ठार
पश्चिम महाराष्ट्र बातमी

कराडजवळ आणखी एक अपघात; स्विफ्ट डिव्हायडरला धडकली, 4 ठार

कराड : पुणे बंगळुरु महामार्गावर गेल्या रविवारी मोठा अपघात झाला होता. या अपघातात ३ जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आज (ता. ०७) आणखी एक अपघात झाला असून या अपघातात ४ जण ठार झाले आहेत. मारुती स्विफ्ट डिझायर कारला भीषण अपघात झाला असून एक जण जखमी असून तातडीने रग्णालयात हलवण्यात आले आहे. कराड तालुक्यातील वहागाव गावच्या हद्दीत दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कोल्हापूरहून (MH07AB5610) या स्विफ्ट डिझायर कारने पाच जण पुण्याच्या दिशेने जात होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भरधाव स्विफ्ट कार वहागाव या ठिकाणी पोहोचली असता अचानक वाहनचालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि गाडी सरळ महामार्ग ओलांडून पुण्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या अज्ञात वाहनाला जाऊन जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये कारचा संपूर्णपणे चक्काचूर झाला.

कराडमध्ये झालेल्या अपघातात पुण्यातील तिघांचा मृत्यू; सात जखमी

या कारमधील पाच जणांपैकी तीन जण जागीच ठार झाले. घटनास्थळी स्थानिकांनी जखमी लोकांना बाहेर काढले. तातडीने जखमी झालेल्या एका तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले होते. पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे. अन्य एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.