युवराजचा विक्रम मोडत हा खेळाडू ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
क्रीडा

युवराजचा विक्रम मोडत हा खेळाडू ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

चेन्नई : युवराज सिंहचा विक्रम मोडीत काढत ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. युवराजला दिल्लीनं १६ कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. २०२१ च्या आयपीएल लिलावात ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सनं १६ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं आहे. ७५ लाख रुपयांची मूळ किंमत असणाऱ्या ख्रिस मॉरिसला खरेदी करण्यासाठी संघमालकांमध्ये रस्सीखेच झाली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आरसीबी, चेन्नई, पंजाब आणि राजस्थान या संघानं ख्रिस मॉरिसला आपल्या संघात घेण्यासाठी रस दाखवला. मात्र, राजस्थान संघानं १६ कोटी २५ लाख रुपये खर्च करत आपल्या संघात घेतलं आहे. ख्रिस मॉरिसनं गतवर्षीच्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना ९ सामन्यात ११ बळी घेतले होते. गेल्या आयपीएलच्या लिलावत मॉरिसला १० कोटी रुपयांत आरसीबीनं खरेदी केलं होतं. मात्र, यंदा आरसीबीनं मॉरिसला करारमुक्त केलं होतं.

आयपीएलच्या इतिहासातील यापूर्वीचे सर्वात महागडे खेळाडू
१ ) युवराज सिंह : २०१५ मधील लिलावात युवराजला दिल्लीनं १६ कोटी रुपयांत विकत घेतलं होतं. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वातम मोठी बोली होती.
२) पॅट कमिन्स : २०२० मध्ये कमिन्सला १५ कोटी ५ लाख रुपयांना कोलकातानं खरेदी केलं होतं.
३) बेन स्टोक्स : इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्लाला २०१७ मध्ये १४.५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं.
४) युवराज सिंह : २०१४ मध्ये युवराजला आरसीबीनं १४ कोटी रुपयांत खरेदी केलं होतं.
५) बेन स्टोक्स : २०१८ मध्ये बेन स्टोक्सला राजस्थान रॉयल्स संघानं १२.५ कोटी रुपयांना खरेदी केलं आहे.