राणेंच्या अटकेची भाजपाध्यक्षांनी घेतली दखल; म्हणाले…
राजकारण

राणेंच्या अटकेची भाजपाध्यक्षांनी घेतली दखल; म्हणाले…

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेली अटक म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी केली आहे. त्यांनी राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेला मिळत असल्याचा पाठिंबा पाहून महाविकासआघाडी सरकारने हे पाऊल उचलले असल्याचेही नड्डा यांनी म्हटले आहे. नड्डा यांनी याबाबत ट्विट केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नड्डा म्हणाले महाविकासआघाडी सरकारच्या या वक्तव्याला आम्ही घाबरत नसून लोकशाही मार्गाने आम्ही लढा चालूच ठेवणार आहोत. त्याचबरोबर राणेंना अटक झाली असली तरी जनआशिर्वाद यात्रा थांबणार नसल्याचेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणेंना चांगलंच भोवलं आहे. नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नारायण राणेंना अटक कऱण्यासाठी पोलीस अधीक्षक पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र नंतर त्यांना अटक करुन गाडीतून नेण्यात आलं. त्यांना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.