सनरायजर्सने संघात कायम राखले सर्वाधिक खेळाडू; ऑस्ट्रेलिया, विंडिजच्या दाखवला रस्ता
क्रीडा

सनरायजर्सने संघात कायम राखले सर्वाधिक खेळाडू; ऑस्ट्रेलिया, विंडिजच्या दाखवला रस्ता

हैद्राबाद : आयपीएल 2021साठी हा सनरायजर्स संघ कंबर कसत असतानाच संघातील तब्बल २२ खेळाडूंना व्यवस्थापनाने कायम राखले आहे. तर ५ खेळाडूंना करारमुक्त केले आहे. सनरायजर्स हैद्राबादने सर्वाधिक खेळाडू संघात कायम ठेवले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डेव्हिड वॉर्नर, अभिषेक शर्मा, बासिल थम्पी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर , वृद्धिमान साहा, विराट सिंग, प्रियम गर्ग, मिचेल मार्श, जेसन होल्डर आणि अब्दुल समद हे खेळाडू संघाने कायम ठेवले आहेत. तर, बिली स्टॅनलेक, संदीप बावनका, फॅबियन अ‍ॅलन, संजय यादव आणि पृथ्वीराज यार्रा या खेळाडूंना करारमुक्त केले आहे.

दरम्यान, २०२०च्या आयपीएल स्पर्धेत डेव्हिड वॉर्नरच्या सनरायजर्स हैद्राबाद संघाने धडाकेबाज कामगिरी करून दाखवली. वॉर्नर आणि कंपनीने स्पर्धेत प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याची किमया साधली. दुसऱ्या पात्रता फेरीत त्यांना दिल्लीकडून हार पत्करावी लागली, पण त्यांनी जोरदार झुंज दिली होती.