धावपटू हरमिलन कौरने १९वर्षे जुना विक्रम मोडत मिळवलं पदक
क्रीडा

धावपटू हरमिलन कौरने १९वर्षे जुना विक्रम मोडत मिळवलं पदक

नवी दिल्ली : पंजाबच्या हरमिलन कौर बैन्सनं ६०व्या राष्ट्रीय ओपन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत १९वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. १५ हजार मीटर धावण्याची स्पर्धा जिंकली आहे. २१वर्षीय हरमिलने चार मिनिटं ५ सेंकदात अंतर पार केलं. यापूर्वी सुनीता राणीनं चार मिनिंटं ६ सेकंदात अंतर पार करत स्पर्धा जिंकली होती. बुसानच्या २००२ अशियाई स्पर्धेत हा विक्रम प्रस्थापित केला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हरमिलनने ४:०५:३९ सेंकदात १५ हजार मीटर अंतर पार करत विक्रम आपल्या नावावर केला आहे. स्पर्धेनंतर अमनदीप यांनी सुवर्णपदकासह मुलीसोबत सेल्फी घेतला. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. अपेक्षेशिवाय धावणं हे राष्ट्रीय चॅम्पियन बनण्याचं मुख्य कारण आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला ४:१४:६८ असा तिची कामगिरी होती. आता हरमिलननं तिची कामगिरी १० सेकंदांनी सुधारली आहे. वजन कमी करत वेगावर लक्ष केंद्रीत केलं. त्याची तिला मदत झाली, असं प्रशिक्षक सैनी यांनी सांगितलं.

मी आता मोकळपणाने धावू शकते, असं हरमिलन कौर हीने सांगितलं. हरमिलनच्या घरात दोन क्रीडापटू आहेत. हरमिलन धावपटू अमनदिप सिंह आणि धावपटू माधुरी सिंह यांची मुलगी आहे. त्यामुळे तिच्यावर अपेक्षांचं ओझं होतं. मात्र हे दडपण दूर करत तिने ही कामगिरी केली आहे. विशेष हरमिलनने वारंगलपर्यंत एकटी आली होती. तिचे वडील काही दिवसांनी आले आणि प्रेक्षकांप्रमाणे स्टॅण्डवरून शर्यत पाहिली. त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे प्रशिक्षकही दडपणाखाली होते. ते प्रत्येक बारकावे जवळून बघत होते. प्रत्येक तपशीलाबाबत ते सल्ला द्यायचे. त्यामुळे दडपण असायचं. त्यामुळे स्वत: इथे आली, असं हरमिलन कौर हीने सांगितलं.