भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूची न्यूझीलंडच्या संघात निवड
क्रीडा

भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूची न्यूझीलंडच्या संघात निवड

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. एका 21वर्षांच्या क्रिकेटपटूची न्यूझीलंडच्या संघात निवड झाली आहे. रचिन रविंद्रची न्यूझीलंडच्या टीममध्ये निवड झाली आहे. जून महिन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये 2 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. रचिन रविंद्र हा न्यूझीलंडमधल्या प्रतिभावान खेळाडूंपैकी एक आहे. डावखुरा बॅट्समन आणि स्पिनर असलेल्या रविंद्रने 18व्या वर्षी वेलिंग्टनकडून पदार्पण केलं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने तीन शतकं आणि दोन अर्धशतकं केली आहेत. यामध्ये वेस्ट इंडिज अ विरुद्धच्या शतकाचाही समावेश आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रचिन रविंद्रचा जन्म 18 नोव्हेंबर 1999 साली न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमध्ये झाला. रचिनचे वडील रवी कृष्णमूर्ती सॉफ्टवेयर सिस्टीम आर्किटेक्ट असून ते बँगलोरचे आहेत. तर रचिनची आई दीपा कृष्णमूर्ती वेलिंग्टनमध्ये राहते. रचिन रविंद्रने काहीच दिवसांपूर्वी वेलिंग्टनकडून खेळताना ऑकलंडविरुद्ध 6 विकेट घेतल्या होत्या. त्याआधी नॉर्थन डिस्ट्रीक्टच्या सामन्यात त्याने ओपनिंगला बॅटिंग करत 138 रनची खेळी केली होती. याच कामगिरीमुळे रविंद्रला राष्ट्रीय टीममध्ये जागा मिळाली. न्यूझीलंडचा माजी खेळाडू पीटर फल्टन याने रविंद्र भविष्यातला स्टार असल्याची भविष्यवाणी केली आहे.

रचिन रविंद्रने त्याचं प्रथम श्रेणी पदार्पण नोव्हेंबर 2018 साली पाकिस्तान ए विरुद्ध केलं. रचिनने आतापर्यंत 26 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3 शतकं आणि 9 अर्धशतकांच्या मदतीने 1,470 रन केल्या आहेत. रचिनच्या नावावर 22 विकेटही आहेत. रचिन रविंद्रने लिस्ट ए करियरमध्ये 12 मॅच खेळून 316 रन केले आणि 8 विकेट घेतल्या. तर टी-20 क्रिकेटच्या 22 मॅचमध्ये त्याने 291 रन करून 19 विकेट घेण्यात यश मिळवलं.