श्रेयस अय्यरवर यशस्वी शस्त्रक्रिया; चाहत्यांना दिले धन्यवाद!
क्रीडा

श्रेयस अय्यरवर यशस्वी शस्त्रक्रिया; चाहत्यांना दिले धन्यवाद!

मुंबई : भारतीय संघाचा क्रिकेटपटू श्रेयस अय्यर याच्या खांद्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. श्रेयस अय्यरने त्याच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतरचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. ‘शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि सिंहाच्या काळजाचा निश्चय करून मी लवकरच पुनरागमन करेन, तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद,’ असं श्रेयस अय्यरने म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. चौकार अडवताना तो खांद्यावर पडला होता. दुखापत गंभीर असल्यामुळे अय्यर सीरिजमधून बाहेर झाला होता. डॉक्टरांच्या तपासणीनंतर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचं सांगण्यात आलं होतं. श्रेयस आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी उपलब्ध नसेल. श्रेयस अय्यरच्याऐवजी ऋषभ पंतकडे दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व देण्यात आलं आहे.

शस्त्रक्रियेनंतर श्रेयस अय्यर कमीत कमी चार ते पाच महिने क्रिकेटपासून लांब राहू शकतो, त्यामुळे फक्त आयपीएलच नाही तर त्याला टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यातूनही मुकावं लागू शकतं. सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध टी-20 सीरिज खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. या सीरिजमध्येही श्रेयस अय्यरच्या खेळण्यावर शंका आहे.