अश्विन म्हणतो, तर अर्धी मिशी कापून मैदानात खेळायला येईल
क्रीडा

अश्विन म्हणतो, तर अर्धी मिशी कापून मैदानात खेळायला येईल

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यात युट्यूबमार्फत गप्पा रंगल्या होत्या. त्यावेळी पुजाराचा विषय निघाला. पुजाराबाबत बोलताना विक्रम राठोड म्हणाले, मी पुजाराला अनेकदा सांगतो की पायांचा वापर करून पुढे ये आणि डोक्यावरून हवेत फटका मार. कमीतकमी एकदा तरी मी सांगतोय तसा प्रयत्न कर. पण तो दरवेळी मला वेगळी कारणं देतो. कारण तो अद्यापही माझं म्हणणं मान्य करत नाहीये.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावर बोलताना अश्विनने एक भन्नाट आव्हान पुजाराला दिलं. आता सुरू होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत जर पुजाराने पायांचा वापर करून पुढे येऊन मोईन अली किंवा कोणत्याही फिरकीपटूला हवाई फटका खेळून दाखवला तर मी माझी अर्धी मिशी उडवून टाकेन आणि तसाच मैदानावर खेळण्यासाठी हजर होईन, असं अश्विन म्हणाला.

हे आव्हान खरंच खूप रंजक आहे. मला वाटतं की पुजाराने हे आव्हान आता तरी स्वीकारायला हवं. पण खरं पाहता मला विश्वास आहे की तो असली आव्हानं स्वीकारणार नाही, असं हसत-हसत राठोड म्हणाले.