सलमान-जॉनची बॉक्स ऑफीसवर टक्कर; एकाच दिवशी रिलीज होणार चित्रपट
मनोरंजन

सलमान-जॉनची बॉक्स ऑफीसवर टक्कर; एकाच दिवशी रिलीज होणार चित्रपट

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि अभिनेता जॉन अब्राहमची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार हे आता स्पष्ट झाले आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत अभिनेता जॉन अब्राहम यानं त्याच्या आगामी ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

येत्या मे महिन्यात १४ तारखेला ईदच्या मुहूर्तावर जॉनचा ‘सत्यमेव जयते २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी अभिनेता सलमान खान यानं देखील त्याचा राधे: युअर मोस्ट वाँटेड भाई हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळं बॉक्सऑफीसवर सलमान विरुद्ध जॉन अशी लढत पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, जॉनच्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जॉन अब्राहमची भूमिका असलेल्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाचा हा दुससा भाग असणार आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाचा दुसरा भाग तयार करण्याचा निर्णय घेतला होता. जॉन अब्राहम या चित्रपटात दुहेरी नाही, तर चक्क तिहेरी भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जातंय.