भारतीय संघाला मोठा झटका; इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून स्टार खेळाडूची माघार
क्रीडा

भारतीय संघाला मोठा झटका; इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून स्टार खेळाडूची माघार

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव केल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध खेळण्यासाठी तयार होत असताना संघाला एक मोठा झटका बसला आहे. ५ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरूद्ध घरच्या मैदानावर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेने सुरूवात होणार आहे. त्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघाची निवड नंतर केली जाणार आहे. ही कसोटी मालिका सुरू होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा याने दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पहिल्या दोन सामन्यांसाठी निवड समितीने जाहीर केलेल्या १८ जणांच्या संघात रविंद्र जाडेजाचा समावेश नव्हता. पण त्यानंतरच्या दोन कसोटींसाठी त्याच्या नावाच विचार केला जाणार होता. असे असताना जाडेजाला बोटाच्या दुखापतीतून सावरण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.

पहिल्या दोन कसोटींसाठी भारताचा संघ-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर