IPL 2021: कोलकात्याने कायम राखले तब्बल १७ खेळाडू; ५ खेळाडूंना घरचा रस्ता
क्रीडा

IPL 2021: कोलकात्याने कायम राखले तब्बल १७ खेळाडू; ५ खेळाडूंना घरचा रस्ता

कोलकाता : आयपीएल २०२०मध्ये कोलकाताच्या संघाचे नेतृत्व सुरूवातीला दिनेश कार्तिकने केलं होते. पण काही सामन्यांनंतर मात्र कार्तिकच्या जागी इयॉन मॉर्गनने ही जबाबदारी स्वीकारली. कर्णधारपदाचा भार आणि फलंदाजी अशी दुहेरी जबाबादारी कार्तिकला शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मॉर्गनच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अगदी शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत कोलकाताचा संघ झुंज देत होता, पण अखेर त्यांना प्ले-ऑफ्स फेरी गाठण्यात अपयश आले. या स्पर्धेनंतर आता पुढच्या वर्षीच्या स्पर्धेसाठी त्यांनी कंबर कसली आहे. आयपीएल 2021 लिलावाच्या आधी त्यांनी एकूण ५ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला असून अनेक खेळाडूंना संघात कायम राखले आहे.

इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, नितीश राणा, शुबमन गिल, रिंकू सिंग, राहुल त्रिपाठी, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वारियर, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसल, सुनील नारायण आणि टिम सिफर्ट अशा १७ खेळाडूंना कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने कायम ठेवले आहे. तर टॉम बँटन, ख्रिस ग्रीन, निखिल नाईक, सिद्धार्थ एम आणि सिद्धेश लाड अशा पाच खेळाडूंना संघाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.