पंतप्रधान मोदींच्या बायडेन यांना शुभेच्छा; म्हणाले…
राजकारण

पंतप्रधान मोदींच्या बायडेन यांना शुभेच्छा; म्हणाले…

नवी दिल्ली : जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायडेन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी बायडेन यांनी शपथ घेतल्यानंतर ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलं. बायडेन यांचं अभिनंदन करताना मोदी म्हणाले, भारत-अमेरिकेतील संबंध समान मूल्यांवर आधारित आहे. आपल्याकडे भरीव असा बहुअंगी द्विपक्षीय अजेंडा आहे. जो आर्थिक गुंतवणुकीबरोबरच उत्साही लोकांसोबतचे संबंध वृद्धिंगत करत आहे. भारत-अमेरिकेतील भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी बायडेन यांच्यासोबत काम करण्यास कटिबद्ध आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्याबद्दल मी जो बायडेन यांचं अभिनंदन करतो. भारत-अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मी बायडेन यांच्यासोबत काम करण्याची प्रतीक्षा करत आहे. अमेरिकेचं यशस्वी नेतृत्व करण्यासाठी माझ्या शुभेच्छा कारण, आपल्याला जागतिक शांतता आणि सुरक्षा पुढे नेण्यासाठी समान आव्हानांचा सामना करावा लागत आहे, असंही मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी बायडेन यांच्याबरोबर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणाऱ्या कमला हॅरिस यांचंही अभिनंदन केलं आहे. उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलेल्या कमला हॅरिस यांचं अभिनंदन. हा ऐतिहासिक क्षण आहे. भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आशादायी आहे. भारत-अमेरिका भागीदारी विश्वासासाठी फायदेशीर आहे, असं मोदी यांनी हॅरिस यांचं अभिनंदन करताना म्हटलं आहे.