सचिनचा जवळचा मित्र, माजी क्रिकेटपटूचे कोरोनामुळं निधन
क्रीडा

सचिनचा जवळचा मित्र, माजी क्रिकेटपटूचे कोरोनामुळं निधन

मुंबई : मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळलेले माजी क्रिकेटपटू आणि भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे जवळचे मित्र विजय शिर्के यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. विजय शिर्के हे ८० च्या दशकात मुंबईकडून सचिन आणि विनोद कांबळी यांच्यासोबत खेळायचे. आपल्या जवळच्या मित्राच्या निधनाने भावूक झालेल्या सचिनने ट्विटरवरुन त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एमसीएच्या १७ वर्षाखालील उन्हाळी शिबीरांत दोन वर्ष शिर्के यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं होतं. मुंबई आणि स्थानिक क्लब क्रिकेटमध्ये खेळताना विजय शिर्के नव्या चेंडूवर जोरदार गोलंदाजी करायचे. त्यांच्याकडे चेंडू स्विंग करण्याची एक खास शैली होती. त्यांच्या निधनामुळे मुंबई क्रिकेटने एका चांगल्या खेळाडूला गमावल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, शिर्के यांच्या निधनामुळे मुंबई क्रिकेटला मोठा धक्का बसल्याची भावना बोलून दाखवली जात आहे. काही वर्षांपूर्वी विजय शिर्के हे मुंबईवरुन ठाण्यात स्थायिक झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचादादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.