ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे पुढील काही दिवसांसाठी रद्द
कोरोना इम्पॅक्ट

ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे पुढील काही दिवसांसाठी रद्द

नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या हवाई प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमधील कोरोना स्थिती लक्षात घेत ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे २२ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने जाहीर केला आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंबंधी तत्काळ हालचाली करत एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. त्यानंतर ब्रिटनमधून येणाऱ्या उड्डाणं थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंग्लंड देशात कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 1000 रुग्णांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान, या विषाणूचा संसर्ग वाढत जरी असला, तरी हा विषाणू आधीच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत कमी संहारक आहे. तशी माहिती ब्रिटिश वैज्ञानिकांनी दिली आहे.

जगभरातील देश कोरोना महामारीशी लढत असताना ब्रिटनमध्ये पुन्हा कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. हा विषाणू वेगाने पसरत असल्याने सगळेच देश सतर्क झाले आहेत. केंद्र सरकारनेही याची गंभीर दखल घेत ब्रिटन आणि भारतामधील विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. ही बंदी उद्या मध्यरात्रीपासून लागून होणार आहे.दिल्ली आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडूनही केंद्र सरकारकडे या देशातील विमान वाहतूक थांबवण्याची मागणी करण्यात आली होती.

ब्रिटनच्या शासनाकडून व्हायरसचा हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तेथून येणाऱ्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी घातली आहे. भारतातही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विमान वाहतूकीवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका वर्षात कोविड -19 ला सामोरे जाण्यासाठी जे महत्वाचे होते, त्या सर्व गोष्टी सरकारने केल्या आहेत. अशातच, ब्रिटनमध्ये अडलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या (स्ट्रेन) संसर्गाबाबत सरकार सतर्क असून घाबरून जाण्याची गरज नाही.

खबरदारी म्हणून ट्रान्झिट फ्लाईटसमधून ब्रिटनवरून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर अनिवार्य आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागणार आहे. नव्या करोना स्ट्रेनचा फैलाव रोखण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आलाय. २२ डिसेंबर रोजी रात्री ११.५९ पूर्वी टेक ऑफ केलेल्या विमानांतील प्रवाशांना भारतात आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागेल.

तसेच, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही ब्रिटनच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. ते नवीन विषाणू संदर्भातील विश्लेषण आणि चालू असलेल्या संशोधनाची माहिती आम्हाला देत आहेत. यासंदर्भात आम्ही लोकांना अद्यायावत करत आहोत. आम्ही नवीन कोरोना विषयी जाणून घेत असून लवकरच या व्हेरिएंटच्या वैशिष्ट्यांचे स्पष्ट चित्र असेल.