INDvsAUS : सिडनीतील तिसरा कसोटी सामना होऊ शकतो रद्द
क्रीडा

INDvsAUS : सिडनीतील तिसरा कसोटी सामना होऊ शकतो रद्द

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान सध्या कसोटी मालिका सुरु असून पहिली कसोटी ऑस्ट्रेलियांने जिंकली आहे. तर दुसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. अशात तिसरा कसोटी सामना हा सिडनीमध्ये खेळवला जाणार होता. परंतु तो आता रद्द होण्याची शक्यता आहे. कारण, सिडनीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत चालला आहे, त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया मेलबर्नमध्येच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्ट मॅचचं आयोजन करू शकते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे टेस्ट सुरू होणार आहे. तर तिसरी टेस्ट 7 जानेवारीपासून सिडनीमध्ये आहे. सिडनीच्या उत्तर भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे इकडे 23 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मेलबर्नमध्येच तिसऱ्या टेस्ट मॅचचं आयोजन व्हायची शक्यता आहे.

भारतीय टीमला या या संभाव्य बदलाबाबत सांगण्यात आलं आहे. लवकरच याबद्दल अधिकृत घोषणा होऊ शकते. सिडनीमध्ये कोरोनाचे 30 नवे रुग्ण आढळल्यानंतर काही कॉमेंटेटर आणि अन्य कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रविवारीच सिडनीमध्ये टेस्ट होईल, असं स्पष्ट केलं होतं, पण मागच्या 24 तासांमध्ये गोष्टी बदलल्या. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सिडनीमध्ये टेस्ट खेळवणं क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सुरक्षित वाट नाही.