कोहलीचा आणखी एक रेकॉर्ड; असा वेगवान धावा करणारा जगातील एकमेव फलंदाज
क्रीडा

कोहलीचा आणखी एक रेकॉर्ड; असा वेगवान धावा करणारा जगातील एकमेव फलंदाज

सिडनी : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आणखी एक विश्वविक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान 22 हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली जगातील पहिला फलंदाज बनला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सिडनी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात विराटने ही कामगिरी केली. विराटने या डावात 78 धावा करताच त्याने हा रेकॉर्ड बनवला. त्याच प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 22000 धावा पूर्ण केल्या. विराटने टी-20, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये या 22 हजार धावा केल्या आहेत.

विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजारांपासून 22 हजारांपर्यंत सर्वांत वेगवान धावा करण्याचे रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केले आहेत. या सामन्यात विराट कोहली 87 बॉलमध्ये 89 धावांची खेळी करून बाद झाला. विराटने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 70 शतके केली आहेत.

या सामन्यात 69 धावा पूर्ण करताच विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही 2 हजार धावांचा टप्पाही ओलांडला. याबाबत तो भारताचा तिसरा खेळाडू तर जगातील पाचवा खेळाडू ठरला. त्यांच्याआधी डेसमॉन्ड हंस, विव्ह रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांनी कांगारू संघाविरुद्ध ही कामगिरी केली आहे.