INDvsAUS : भारताचा लाजिरवाणा पराभव; दुसऱ्या वनडेसह ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली
क्रीडा

INDvsAUS : भारताचा लाजिरवाणा पराभव; दुसऱ्या वनडेसह ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली

सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला असून या ऑस्ट्रेलियाने या विजयाशह तीन सामन्यांची मालिका २-० अशी आधीच जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्या सामन्यात भारताला ३९० धावांचे हिमालयाएवढे आव्हान ठेवले होते. स्टीव्ह स्मिथकडून स्फोटक शतकी खेळी केली आणि अन्य चार जणांनी धडाकेबाज अर्धशतक करून संघाला ३८९ पर्यंत मजल मारून दिली. उत्तरादाखल भारताला ९ बाद ३३८ इतक्या धावा करता आल्या आणि भारताचा ५१ धावांनी पराभव झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शिखर धवन आणि मयांक अग्रवाल यांनी चांगली सुरूवात करून दिली. या दोघांनी अर्धशतक करून दिले. पण शिखर ३० धावांवर बाद झाला. त्यानंतर मयांक अग्रवाल देखील २८ धावांवर माघारी परतला. सलामीची जोडी बाद झाल्यानंतर भारताची अवस्था दोन बाद ६० अशी झाली होती. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी ९३ धावांची भागिदारी केली. श्रेयस ३८ धावा केल्या. त्यानंतर केएल राहुल सोबत विराटने धावांचा वेग वाढवला पण हेनरिक्सच्या एका अप्रतिम झेलवर तो ८९ धावांवर बाद झाला.

विराट बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांनी आक्रमक फलंदाज केली. मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात राहुल ७६ धावांवर बाद झाला. त्याने ६६ चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकार मारले. त्यानंतर रविंद्र जडेजा २४ धावा करून माघारी परतला. त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाला. त्याने ३१ चेंडूत २८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ३, जोश हेजलवुड, अॅडम जाम्पा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.